जालना: 6 घरफोडीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3 आरोपी जेरबंद; 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | May 28, 2026 जालना जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, घरफोडी करणारे 2 आरोपी तसेच चोरीचा माल खरेदी करणारा 1 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार दि. 28 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.