नागपूर ग्रामीण: बनावट कागदपत्रांच्या आधारे अभियांत्रिकी प्रवेश; अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशीचे आदेश: प्यारे खान
राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याच्या तक्रारींची राज्य अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून (ARA) याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला आहे.