चिखलदरा: जारीदा येथील रेस्ट हाऊसमध्ये युवा स्वाभिमान पार्टीची चिखलदरा तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
चिखलदरा तालुक्यातील जारीदा येथील रेस्ट हाऊसमध्ये आज दुपारी ४ वाजता युवा स्वाभिमान पक्षाच्या चिखलदरा तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.बैठकीत पक्षातील एकी, संघटन बांधणी,युवकांना संधी,गावागावातील समस्यांवर पक्षाचा सक्रीय सहभाग यावर विशेष भर देण्यात आला.तालुका कार्यकारिणीत अनेक नवे चेहरे संधी मिळवत पक्ष बांधणीला बळकटी मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.