अकोला जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्या या ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ९० ते ९५ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. या दरम्यान, अकोल्यातील दुधाळा गाव शेत शिवार परिसरातील शेतातही हरभरा, गहू, ज्वारी, मोहरी या प्रमुख पिकांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुरेसा पाऊस, उपलब्ध पाणी साठे आणि अनुकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे