अलिबाग: सहाआसनी रिक्षाचालकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक .विविध प्रलंबित मागण्यासाठी मोर्चा
Alibag, Raigad | Dec 12, 2025 रायगड जिल्ह्यातील सहा आसनी प्रवासी रिक्षाचालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आपल्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन देखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. सहा आसनी वाहनांची वयोमर्यादा किमान पाच वर्षांनी वाढवावी, सहाआसनीच्या परवान्यावर सहा आसनी बदली वाहन द्यावे, पासिंग फीची भरमसाठ वाढ कमी करावी, माणगाव येथील पासिंग ट्रॅक तातडीनं सुरू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.