जालना: भुतेगाव येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप; शेकडो घरकुलासाठी पात्र कुटुंबांना दिलासा
Jalna, Jalna | Jun 2, 2026 घनसावंगी तालुक्यातील भुतेगाव येथील दुधना नदीवरील वाळू घाटातून शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वाटप करण्यात आल्याने शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवार दि. 2 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा कच्चा माल वेळेत उपलब्ध व्हावा आणि लाभार्थ्यांवरील आर्थिक भार कमी व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महसूल विभागाच्या देखरेखीखाली आणि शासनाच्या निर्देशानुसार वाळू वाटप सुरू आहे.