राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार व मानधनात दुप्पट वाढ करण्याबाबत आमदार नाना पटोले यांनी सभागृहात मागणी केली. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील युवक युवतींना खाजगी आस्थापनामध्ये 11 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. या योजनेत प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे 1 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे हे सर्व प्रशिक्षित तरुण पुन्हा बेरोजगार झाले आहेत.