कोरेगाव: कोरेगावातील खराब रस्त्याच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; भर पावसात थेट खड्ड्यात केले वृक्षारोपण
कोरेगाव शहरातील महत्त्वपूर्ण रस्ता असलेल्या जुना मोटार स्टँड ते डी. पी. भोसले कॉलेज दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत न मुजविल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता भर पावसात जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले. यावेळी बांधकाम खात्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.