परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज बुधवार दि.17 डिसेंबर रोजी, सकाळी 11 च्या दरम्यान, नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित वेळेनुसार झाल्याची माहिती आ. मुंडे यांनी दिली आहे. या भेटीदरम्यान परळी वैद्यनाथ येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनामध्ये समावेश करण्याबाबत त्यांनी विनंती केली. यासोबतच मतदार संघातील एका कारखान्या संदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. ही भेट पूर्वनियोजितच होती, असे