कोरेगाव: मजूर न पुरविता व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक; रायगड जिल्ह्यातील व्यक्तीविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडी येथील वीटभट्टीसाठी १२ मजूर पुरविण्याचे कबूल करून त्यासाठी तीन लाख रुपयांची उचल घेऊन देखील मजूर न पुरवता फसवणूक केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील एका व्यक्ती विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ दादासाहेब यादव यांची भाटमवाडी येथे वीटभट्टी असून या वीटभट्टीवर काम करण्यासाठी सहा जोड्या म्हणजेच १२ मजूर पुरवतो असे राजू दत्तात्रय जाधव यांनी सांगितले होते.