जालना: जुन्या जालना परिसरात गोमांस विक्रीवर पोलीसांचा छापा; 90 किलो मांस जप्त, एकावर गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Jun 20, 2026 जालना शहरातील जुन्या जालना परिसरातील दुःखी नगर येथे अवैधरित्या गोवंशीय मांसाची कत्तल करून विक्री केल्याप्रकरणी कदीम पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून सुमारे 90 किलो मांस जप्त केले. शनिवार दि. 20 जून 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कदीम पोलीस ठाण्याचे कर्मचारी खलिल सुलेमान बेग हे 18 जून रोजी दुपारी पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली.