पो.स्टे. रामटेक अंतर्गत येणाऱ्या चिचाळा नजीकच्या मौजा चाकोला रिठी येथे ठेक्याने केलेल्या दोन एकर शेतात 28 मार्चला सहा पोती तुरी मशीनद्वारे काढून रात्र झाल्याने तिथेच ठेवल्या. मात्र एक मार्चला सकाळी शेतात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी ठेवलेल्या सहा पोतींपैकी तीन पोती न दिसल्याने सोमवार दोन मार्चला पोलीस स्टेशन रामटेक येथे चोरीची तक्रार नोंदवली असल्याची माहिती शेतकरी जियालाल उमराव मोहारे,, वय 54 वर्षे राहणार चिचाळा यांनी दिली.