अमरावती: शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर, नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर अंतिम मुदत
शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर * नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर अंतिम मुदत अमरावती, दि. 14 (जिमाका) : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी 1 नोव्हेंबर 2025 ही यासाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम राहणार आहे.