नागपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. उमेदवारी अर्जांच्या महत्त्वपूर्ण छाननी प्रक्रियेनंतर शहरातील १० झोनमध्ये एकूण १२९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर विविध तांत्रिक कारणांमुळे ८० उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले असून त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.महिला उमेदवारांचा मोठा सहभाग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.