येत्या सिंहस्थ कुंभमेळा काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले. पायाभूत सुविधा तसेच गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आज भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ विभागीय शाखा अधिकाऱ्यांसह नाशिक रोड व देवळाली स्थानकांची सविस्तर पाहणी केली.