ठाणे: नवी मुंबईकरांनो सावधान! तुमच्या घरात काम करणारी मोलकरीण बांगलादेशी नाही ना? खारघर पोलिसांनी केली मोठी कारवाई
Thane, Thane | Nov 29, 2025 नवी मुंबई परिसरामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अचानक पडताळणी मोहीम राबवली आणि वैद्य कागदपत्र नसलेल्या तब्बल 102 बांगलादेशी महिला ताब्यात घेतल्या. त्यांच्या कागदपत्रांची चौकशी केली असतात ७० हून अधिक महिलांना कोणतेही नागरिकत्वाचे पुरावे देता आले नाहीत. त्यामुळे त्या अवैध ठरल्या आहेत. नवी मुंबई परिसरातील अनेक घरांमध्ये मोलकरणीचे काम करत आहेत,त्यामुळे नागरिकांनी कागदपत्रांची तपासणी करून शहानिशा करूनच कामावर ठेवावे असे आवाहन नवी मुंबईकरांना केले आहे.