श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील जसवली येथे ‘श्रीवर्धन विभाग गवळी समाज’ सभागृहाचा लोकार्पण सोहळा
आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यातील जसवली येथे ‘श्रीवर्धन विभाग गवळी समाज’ सभागृहाचा लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, गवळी समाजातील बंधू-भगिनी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित करत ‘तालुक्यात विविध समाजघटकांसाठी सभागृहांची निर्मिती करण्यात येत आहे. या नव्या वास्तूमध्ये समाजपयोगी उपक्रम राबवून तिचा अर्थपूर्ण वापर करावा. विशेषतः महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडूनही संपूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.