भंडारा: भंडारा नगर परिषद निवडणुकीत विक्रमी उत्साह! पडताळणीनंतर २१४ नगरसेवक व ११ अध्यक्ष पदाचे उमेदवार रिंगणात!
भंडारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी, निवडणूक निर्णय अधिकारी, भंडारा यांच्या कार्यालयाने अर्ज पडताळणीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान जाहीर केली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष (President) आणि नगरसेवक (Corporator) पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. ३५ नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. ०१ ते १७ मधील एकूण २१४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. याव्यतिरिक्त, अध्यक्षपदासाठी एकूण ११ उमेदवारांचे अर्ज विधीग्राह्य ठरले असून, त्यात प्रमुख