जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करत कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना भोसरीतील राणतारा कॉलनी परिसरात घडली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अक्षय गोडसे (वय ३०) आणि सोन्या गुप्ता (वय १८, दोघेही रा. राणतारा कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.