वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास निधीतील टेंडर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल - राजेभाऊ फड
Parli, Beed | Sep 15, 2024 राज्य शासनाच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी व तीर्थक्षेत्र विकासासाठी 286 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतील स्वागत कमानी व मेरुगिरी पर्वतावरील दुरुस्ती यासाठी सुमारे 54 कोटी रुपयांचे टेंडर परळी नगर परिषदेने काढले आहेत. परंतु हे टेंडर अंबानी, अदानी सारखे उद्योगपती जरी आले तरी त्यांना टेंडर भरता येऊ नये अशी अवस्था केल्याचा आरोप राजेभाऊ फड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.हे टेंडर इतरांनाही भरता यावे यासाठी आपण औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले