श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी
Parli, Beed | Sep 13, 2024 परळी शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासन यांनी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हवी याबाबत पाहणी केली.