नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ मधुकर आघाव यांची निवड
Parli, Beed | Sep 13, 2024 येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. परळी तालुक्यामध्ये राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये डॉ आघाव यांची यशस्वी वाटचाल राहिलेली आहे.