जालना: अवैध मास विक्री, मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या प्रश्नावर मनपासमोर उपोषण १५ मेपर्यंत कारवाईचे प्रशासनाचे लेखी आश्वासन; टास
Jalna, Jalna | May 2, 2026 जालना शहरात उघड्यावर सुरू असलेल्या अवैध मास विक्रीमुळे वाढत चाललेली अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात वाढलेला मोकाट कुत्र्यांचा त्रास तसेच शहरभर मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या समस्येविरोधात आज जालना महानगरपालिकेसमोर एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शहरातील विविध राजकीय पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. या उपोषणात माजी आमदार Kailas Gorantyal, महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजप महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्यासह अने