निफाड: निफाड तहसिलदारांच्या संवेदनशीलतेने चिमुरडीच्या उपचाराचा मार्ग मोकळा
Niphad, Nashik | Sep 17, 2025 वाकद येथील आदिवासी कुटुंबातील चिमुरडीला हृदयाच्या झडपेस छिद्र असल्याने तातडीने उपचारांची गरज होती. मात्र शिधापत्रिका व आधारकार्ड नसल्याने तिच्या मोफत उपचारात अडथळा निर्माण झाला होता. अखेर निफाडचे तहसिलदार मा. विशाल नाईकवाडे यांनी संवेदनशीलता दाखवत आवश्यक कागदपत्रांची सोय करून दिल्यामुळे उपचाराचा मार्ग मोकळा झाला.