नागपूर येथील प्रसिद्ध डागा मेमोरियल रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका ३ किलो वजनाच्या सुदृढ नवजात बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचे बाळ गर्भात पूर्णपणे निरोगी होते. मात्र, जन्मानंतर बाळाची प्रकृती खालावली असता रुग्णालयात व्हेंटिलेटर सारख्या अत्यावश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध झाल्या नाहीत.