पाचोरा: जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी तहसील आवारात संदीप कोळी यांचे आमरण उपोषण सुरू, उपोषणाचा आजचा तिसरा दिवस,
जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कसाठी पाचोरा तालुक्यातील आखतवाडी येथील संदिप मच्छिंद्र कोळी हे शहरातील तहसील आवारात आमरण उपोषणास बसले असून आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी उपोषणाचा तिसरा दिवस अजून आजही उपोषण सुरूच आहे, सायंकाळी सहा वाजता प्रकृती अधिकच खालावलेली दिसून येत आहे,