अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शिरूर ताजबंद येथे शुभारंभ
Ahmadpur, Latur | Sep 17, 2025 महाराष्ट्रातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने अनेक कल्याणकारी योजनांच्या एकत्रीकरणातून "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" दिनांक १७ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. आज ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच हैदराबाद गॅझेटनुसार मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले.