11जानेवारीला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरात बॅटरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने सक्करधरा आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॅटरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून, याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे आरोपीमध्ये सोहेल उर्फ खटमल शफिक खान आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.आरोपीकडून ६०,००० रुपये किमतीच्या ४ 'ईस्टमॅन' कंपनीच्या बॅटऱ्या जप्त करण्यात आला