कन्नड शहर पोलिसांनी सायबर फसवणूक प्रकरणातील ३८ हजार रुपये गमावलेल्या व्यक्तीला १० हजार १०७ रुपये परत मिळवून दिले आहे. कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील भाऊसाहेब काळे यांनी त्यांची ३८ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची तक्रार कन्नड शहर पोलीसठाण्यात दिलेली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी सायबर पोर्टलवर ऑनलाईन ही तक्रार नोंद केली होती.