जालना: जालना शहरातील भवानीनगर येथील अवैध मांस विक्री केंद्रावर महापालिकेची कारवाई; दुकान सील
Jalna, Jalna | May 30, 2026 जालना शहरातील भवानीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध मांस विक्री केंद्रावर जालना महानगरपालिकेने कारवाई करत संबंधित दुकान सील केले. शनिवार दि. 30 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भवानीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या मांस विक्री सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती. मांस विक्रीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होत होती. तसेच उघड्यावर मास टाकण्यात आलं होतं.