काटोल शहरातील आय यु डीपी कॉलनी, धंतोली तार बाजार येथील नागरिकांना दीर्घ काळापासून प्रदंबित असलेल्या मालकी हक्काच्या पट्ट्यांबाबत आज मुख्यमंत्री यांना आमदार चरण सिंग ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर चर्चा करत या मागणी बाबतचे निवेदन दिले. दरम्यान मुख्यमंत्री यांनी या विषयाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर कार्यवाही करून हा प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले.