आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर, आज दि 10 नोव्हेंबर ला 12 वाजता एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी चंद्रपूर येथे विशेष भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह त्यांनी वन अकादमी लगतच्या टायगर सफारीच्या जागेची पाहणी केली.