वेंगुर्ला: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त युवानेते विशाल परब यांच्या तर्फे वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिका
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त जनसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्या अंतर्गत भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. वेंगुर्ले शहरातील जनतेला येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी साठी आपण जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प विशाल परब यांनी केला होता. या संकल्पाची पूर्ती रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्लेत करण्यात आली.