चिखलदरा: वाघडोह ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पतींचा दबदबा;दडपशाही, धमक्या आणि अनियमिततेचे आरोप
वाघडोह ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्या नात्यातील दबदबा आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाचे वादळ उसळले आहे.ग्रामपंचायतीतील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पतींवर संतोष शामराव लंगोटे आणि आनंद शिवचरण गाठे यांच्यावर धमक्या देणे,दडपशाही करणे आणि पंचायत कामकाजात बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणी ग्रामपंचायतीचे रहिवासी रमेश सुराजू गाठे यांनी पंचायत समिती अचलपूर,जिल्हा परिषद अमरावती, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दुपारी १ वाजता तक्रार दाखल