जालना: जनार्दन मामा चौक ते उडपी हॉटेल परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम; ४५ अतिक्रमणे निष्कासित
Jalna, Jalna | May 20, 2026 जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख भागांमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत असून, दि. २० मे २०२६ रोजी जनार्दन मामा चौक ते सुभाष चौक तसेच सुभाष चौक ते उडपी हॉटेल परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान संबंधित परिसरातील दुकानांसमोरील तब्बल ४५ अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमध्ये दुकानांसमोरील ओटे, पायऱ्या, शेड तसेच नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून नाले मोकळे करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासोबतच नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ही मोहीम महानगरपालिका आय