कर्जत: कर्जत मध्ये होतोय राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार
राष्ट्रवादी कडून मोठं शक्ती प्रदर्शन
Karjat, Raigad | Sep 20, 2025 राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खा सुनील तटकरे यांना नुकताच एका वृत्त संस्थेकडून भारत भूषण हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या अनुषंगाने त्यांचा भव्य नागरी सत्कार व्हावा असा मानस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मनी बांधला. व हा सत्कार सोहळा त्यांच्या मतदार संघात म्हणजे कर्जत शहरात करण्याचे ठरवले. रविवारी 21 तारखेला सायंकाळी हा सत्कार सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी भव्य स्टेज व पेंडोल उभारण्यात आले आहे आणि दोन ते तीन हजार कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.