कपिलधार वाडी येथील झालेल्या भेगांमुळे तूर्तास संपूर्ण गावाला धोका नाही, भूगर्भ सर्वेक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश
कपिलधार वाडी येथे झालेल्या भेगांमुळे तीन चार घरे सोडता सध्या तरी संपूर्ण गावाला धोका नाही असे निर्देश भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या टीमने आज दिले आहेतमौजे कपिलधारवाडी, ता. जि. बीड येथे उद्भवलेल्या भूस्खलनजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मेगो चासी, संचालक व श्री. संदिपकुमार शर्मा, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण पुणे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन तांत्रिक सर्व्हेक्षण केले. मातीने झाकलेल्या उतारांवरून घसरण होत आहे, काही ठिकाणी मागील उतारांवरून दगड कोसळत आहेत.