कोरेगाव: ऊस तोडणी मुकादम व कामगारांकडून फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक
ऊस तोडणी मुकादम आणि कामगारांकडून कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे. या विषयात कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता प्रांताधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजता याबाबत माहिती दिली.