वाशिम: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सुरकुंडी येथे कायदेविषयक जनजागरण कार्यक्रम संपन्न
Washim, Washim | Oct 15, 2025 जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन निवासी मुलींची आश्रमशाळा, सुरकंडी येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या राज्य गीताने झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. जी. चौखंडे उपस्थित होते. त्यांनी पोक्सो कायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना मुलींच्या सुरक्षेसाठी कायद्याचे भान ठेवण्याचे आवाहन केले.