सुधागड: मुंबई-गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ एसटी व ट्रकचा भीषण अपघात; ट्रक चालकाचा पाय तुटला
मुंबई-गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ आज सकाळी एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा पाय गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज (शुक्रवार) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने समोरून येणाऱ्या ट्रकच्या चालकाकडील बाजूला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे आत घुसला.