तिरोडा: सुकळी/डाकराम येथे राष्ट्रवादीचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य जगदीश बावनथडे यांच्या हस्ते 'दंडार'चे उद्घाटन संपन्न
Tirora, Gondia | Oct 28, 2025 विकासाचे दूरदृष्टी असलेले लोकनेते, राष्ट्रवादीचे धडाडीचे तालुकाध्यक्ष तथा कार्यतत्पर जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांच्या हस्ते सुकळी/डाकराम येथील 'मंढई' उत्सवानिमित्त आयोजित 'दंडार' कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण संस्कृतीचे कट्टर पुरस्कर्ते आणि जनसामान्यांचे आधारस्तंभम्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावनथडे यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.