नागपूर ग्रामीण: खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १८३ केंद्रांना नोटिसा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कृषी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. विभागात खतांची कमतरता नसून, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.१८३ खत विक्री केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. ४३ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे तर दोन विक्री केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.