अकोल्यात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटोचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीसोबत नराधम ऑटो चालकाने लगट करण्याचा प्रयत्न केला असता ऑटोचालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला. कशीबशी या मुलीने ऑटो चालकाच्या तावडीतून सुटका केली. अकोल्यातील या प्रकारामुळे पालकांममध्ये धास्ती निर्माण झालीय. दरम्यान ऑटो चालकाच्या विरोधात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर खान सुभेदार खान असं आरोपी ऑटो चालकाचे नाव आहे.