डहाणू: डहाणू तालुक्यातील कासा-सावन राज्यमार्गावर वाघाडी येथे भीषण अपघात, तीन तरुणांचा जागीच मृत्यू एक महिला जखमी
Dahanu, Palghar | Dec 29, 2024 डहाणू तालुक्यातील कासा-सावन राज्यमार्गावर वाघाडी येथे भीषण अपघात झाला आहे. इको गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन कासा चारोटी येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक महिला गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये राहुल हीरके (२०), चिन्मय चौरे (१९), आणि मुकेश वावरे (२०) यांचा समावेश आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.