हवेली: पिंपरी येथे गुटखा विक्री प्रकरणी तरुणाला अटक
Haveli, Pune | Oct 19, 2025 पिंपरी गावात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एका तरुणाला बेकायदेशीरपणे गुटखा विक्री केल्या प्रकरणी अटक केली. ही कारवाई शनिवारी (१८ ऑक्टोबर) करण्यात आली. रोहित अमृतलाल मौर्य (२३, पवारनगर, काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रणधीर माने यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.