अलिबाग: रायगड जिल्हा सरकारी कार्डियाक मशिनला भाजपकडून नवी बॅटरी
रुग्णालयातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार
Alibag, Raigad | Sep 20, 2025 रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयातील काही दिवसांपासून बंद पडलेल्या कार्डियाक मशिनला अखेर नवी बॅटरी मिळाली असून ही बॅटरी भाजपच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता बसवण्यात आली. त्यामुळे तातडीच्या हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी ॲडिशनल सिव्हील सर्जन शितल, भाजपचे नेते ॲड. आस्वाद पाटील, ॲड. महेश मोहिते, ॲड. मनोज ओव्हाळ, युवा तालुकाध्यक्ष रोशन भगत तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.