मोहाडी: अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या युवकावर पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करू लागला रंजीत चुन्नीलाल खुरपे रा. खैरलांजी,ता. मोहाडी असे आरोपी युवकाचे नाव असून आरोपी हा अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.यावेळी पीडित मुलीने दि. 18 सप्टेंबरला आंधळगाव पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी युवकावर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.