नागपूर शहर: वैशाली नगर येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 16 सप्टेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली नगर येथे शेजारी राहणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.