तुमसर: परसवाडा येथे विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर वर महसूल पथकाची कारवाई, पसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील परसवाडा येथे दि. 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी 7 वा.च्या सुमारास महसूल पथकाचे अधिकारी गस्तीवर असताना त्यांना टिप्पर क्र.MH 49 BZ 5602 यात विनापरवाना 10 ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महसूल पथकाने रेतीचा परवाना मागितला असता टिप्पर चालक रुपेश टिप्पर घेऊन पसार झाला. याप्रकरणी टिप्पर चालक रुपेश व टिप्पर मालक दीपक मानापुरे यांच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.