तुमसर: बजाज नगर तुमसर येथे एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस तपास सुरू
तुमसर शहरातील बजाज नगर येथे एका इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. 27 नोव्हेंबर रोज गुरुवारला पहाटे 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.आशिष मनोहर वनवे वय 38 वर्षे असे मृतक इसमाचे नाव आहे. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण अजून कळाले नसून घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहेत.